जिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर


-जिल्हा रुग्णालयाचे आश्वासन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांची गैरसोय होत असल्याची बाब प्रहार पक्षाच्या लक्षात येताच पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून दिव्यांगांच्या समस्यांवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रुडे यांच्याशी चर्चा केली . यावेळी डॉ. रुडे यांनी दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याचे अश्वासन दिले . त्यामुळे आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे सोयीस्कर होणार आहे . 
जिल्हा रुग्णालय गडचिरोली दिव्यांगांसाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी नेमले आहेत. यामध्ये OPD सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता पर्यंत  व दू ४ ते ६ वा पर्यंत चालू असते. परंतु जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यातुण दिव्यांग बांधव उदा. सिरोंचा भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, कुरखेडा,  हे तालुके गडचिरोली वरुण २०० ते २५० किमी प्रवास करावा लागतो. परिणामी दिव्यांगांणा लांबून प्रवास करूनही रोज हेलपाटे मारावी लागत होते व रुग्णालयात येऊनही प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रत्येक गुरुवार ला चकरा माराव्या लागत होते. हा प्रकार प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली यांना माहिती होताच जिल्हा रुग्णालय गाठले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रुडे  यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली . यामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.         
 यामध्ये दिव्यांगाणा दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी OPD प्रत्येक गुरुवार ला स.१० ते सा.५ वाजेपर्यंत करण्यात आली. तसेच सोबत प्रत्येक विभागानुसार एक्स-रे विभाग, फिसिओथेरिपी, ENT विभाग, ORTHO विभाग, फिसिसियन (MR) विभाग, नेत्र विभाग सुद्धा स.१० ते ५ वा. पर्यंत  सुरू राहणार. दिव्यांगांसाठी एक लॅब तयार करून देणार जेणेकरून प्रत्येक विभागाचे अधिकारी तिथे उपस्थित राहून दिव्यांगांना तपासणी करताना अडचण येणार नाही. हे महत्वपूर्ण निर्णय मान्य केल्याबद्दल जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे.  तसेच प्रहार दिव्यांग क्रांति व प्रहार जनशक्ती पक्ष सेवक यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांचे आभार मानले.   
 यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हा अध्यक्ष मंगेश पोरटे, प्रहार जनशक्ती पक्ष आरमोरी विधानसभा अध्यक्ष इंजि, अक्षय बोरकर, प्रहार रुग्णकल्यान समिति जिल्हा अध्यक्ष विकास धंदरे, आरमोरी शहर अध्यक्ष रिंकू झरकर, आरमोरी प्रसिद्धी प्रमूख विनोद निमजे ईश्वर खोब्रागडे, पोरनिमा शेंडे, संतोष बोरकर, मोनाली सोरते, अक्षय मेश्राम, तारकेश धंदरे, आदि प्रहार सेवक उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-16


Related Photos