महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी अपघातातील मयतच्या कुटुंबीयांना वाहतूक कंपनीच्या वतीने आर्थिक मदत


- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या  प्रयत्नांतून सुरजागड कोनसरी लोह प्रकल्प वाहतूक कंपनीने तीनही मृतकाच्या कुटुंबीयांना केली आर्थिक मदत

- एका परिवारातील सदस्याला नोकरी तर अपघातात जखमी  असलेल्यांच्या उपचाराचा खर्च कंपनी करणार

- कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या परिवारातील सदस्यांची भेट घेवून केले सांत्वन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : २५ सप्टेंबर रोजी सुरजागड प्रकल्पात उत्खनन करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने चामोर्शी येथे मार्कडादेव येथील जंधलवार परिवारातील  भावना नरेश जंधलवार, प्रियंका गणेश जंधलवार, रुद्र गणेश जंधलवार यांचे   दुःखद  निधन झाले. त्यामुळे सुरजागड कंपनीने माणुसकीचा धर्म जोपासीत या अपघातात मृतक झालेल्या  परिवारातील सदस्यांना आर्थिक मदत तर जखमी झालेल्यांवर वैद्यकीय उपचाराचा खर्च करावा अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत सुरजागड कोनसरी लोह प्रकल्प वाहतूक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  मृतकाच्या परिवारातील  सदस्यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांना आर्थिक मदत केली.

यावेळी उपस्थित आमदार डॉ. देवराव होळी यांच्या समक्ष कंपनीने  परिवारातील एका सदस्याला नोकरी तर अपघातात जखमी  असलेल्यांच्या उपचाराचा  खर्च कंपनी करणार असे आश्र्वासन दिले.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, कंपनीच्या वतीने कर्नल महापात्रा, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भोजराज भगत, सरपंच मोगरे, भुजंग आभारे, राजू मोगरे तथा मृतक परिवारातील सदस्य उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos