महत्वाच्या बातम्या

 युवक कांग्रेस व एन.एस.यु.आई तर्फे एस.बी.आय, एल.आय.सी कार्यालयासमोर आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. 

अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. 

हा पैसा सुरक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात युवक कांग्रेस, एन.एस.यु.आई च्या वतीने सोमवारी ६ फेब्रुवारीला बल्लारपुर शहराच्या एस.बी.आय व एल.आय.सी च्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात पुरोगामी पत्रकार संघटनेचे जिल्हा सलाहकार नाना बुंदेल, शंकर महाकाली, अरबाज़ सिद्दीकी, अजय रेड्डी, प्रीतम पाटणकर, दानिश शेख, सुनील मोतीलाल, जिशान सिद्दीकी, सोहिल खान, विकास श्रीवास, विककी गुजरकर, अक्षय गोड़मारे, रोशन ढेगड़े, अज़हर शेख, राजा केशकर, बब्लू प्रसाद, सूरज गेडाम, सोहिल खन्ना, रूपेश भोयर, सुमित देठे, शशि कोटवार, रोहिन सक्सेना, राजेश केसकर, कुशल वर्मा, निखिल वाळके युवक काँग्रेस व एन.एस.यु.आई सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अदानीच्या गैरकारभाराचा भांडाफोड झाला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे, असे असतानाही केंद्र सरकार मौन बाळगून आहे. 

संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत, परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. 

म्हणून युवक कांग्रेस व एन. एस. यू.आईतर्फे धरना प्रदर्शन करण्यात आले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos