महत्वाच्या बातम्या

 सावली : वैनगंगा नदीच्या पुरामुळे कापूस आणि धान पिकांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुरात उसेगाव, जिबगाव, सिर्शी, साखरी, लोंढोली, हराबा, कढोली, डोनाळा, भांशी, नि. पेडगाव सामदा, सोनापूर, वाघोली बुट्टी, व्याहाड बुज या गावांतील कापूस आणि धान शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी प्रशासन आणि सरकारला तत्काळ बुडित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे यांनी या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, या पुरामुळे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन आणि सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत.

शेतकऱ्यांची मागणी -

प्रशासन आणि सरकारने तत्काळ बुडित पिकांचे पंचनामे करावेत, शासनाने नुकसान भरपाई द्यावी, पिक विमा कंपनीने पंचनामे लवकरात लवकर करावेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos