चिमूरात अवैध वाहतूक करणाऱ्या साई ट्रॅव्हल्स च्या मालकाची एस टी आगार प्रमुखास चिरडून ठार मारण्याची धमकी


- पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीस अटक 
- तालुक्यात अवैध धंदेवाल्याची मुजोरी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / चिमूर : 
अवैधरीत्या दारू तस्करी करणाऱ्या दारू विक्रेत्यांनी नागभीडचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना वाहनाखाली चिरडून ठार केल्याची घटना ताजी असतानाच चिमूर येथील बस स्थानकासमोर काल  ११ नोव्हेंबर  रोजी सकाळी चिमूर ते नागपूर चालणाऱ्या साई ट्रॅव्हल्सचे चालक मालक यांनी एसटी आगार प्रमुख प्रितेश रामटेके यांना चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. महेमुद खा अहमद खा पठाण रा गुरुदेव वॉर्ड चिमूर  असे आरोपीचे नाव आहे. 
 बस स्थानकाच्या दारासमोरच ट्रॅव्हल्स उभ्या करून 'चलो नागपूर -  चलो नागपूर'  असे का ओरडता  असे हटकले असता  तुझ्या ने जे बनते करून टाक ,जास्त करशील तर ट्रॅव्हल्स खाली दाबून चिरडून मारून टाकीन अशी धमकी दिली.  तसेच अश्लील शिवीगाळ केली,  अशी तक्रार चिमूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यावर भादवी कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा ), २९४ (अश्लील शिवीगाळ ) , ५०६ जिवे मारण्याची धमकी व मोटार वाहन कायदा कलम१२५(नोपार्किंग) नुसार गुन्हा दाखल करून  आरोपी महेमुद खा अहमद खा पठाण यास अटक केली आहे .  जिल्ह्यात अवैधरीत्या धंदे करणारे मजोर होत चालले असून याचा प्रत्यक्ष उदाहरण पोलीस विभागाला अनुभव आला असून पोलिसांनी अश्या लोकांच्या मुसक्या वेळीच आवरणे गरजेचे आहे .
  चिमूर येथील बस स्थानक हा मुख्य राष्ट्रीय महामार्गवर असून  दुसऱ्या बाजूलाच तहसिल कार्यालय व प्रशासकीय भवन व अनेक शासकीय कार्यालये आहे इथे दिवसभर मोठी वर्दळ व गर्दी असते.  परंतू या बस स्थानका समोरच अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स ,काळी पिवळी ,कमांडर ,आटो आदी वाहनांची गर्दी असते व बस स्थानक मुख्य दारासमोरच प्रवाश्यांना आवाज देऊन बोलविले जाते.  तेव्हा चिमूर आगार प्रमुख यांनी त्यांना हटकले असता आज अवैध वाहतूक करणाऱ्या चालक मालकाने धमकी देत चिरडण्याची धमकी दिली.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-12


Related Photos