कोंढाळा येथे महाशिवरात्री निमित्त शेषसाई महोत्सवाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा १७ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२३ ला महाशिवरात्री निमित्त भव्य शेषसाई महोत्सवाचे आयोजन शेषसाई मंदिरात केले आहे. महोत्सव दिनी १७ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास भजनाचे कार्यक्रम व १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजे वैनगंगा नदी तीरावर मंगल स्नान सकाळी ८.३० वाजे, श्री शेषसाई पालखी मिरवणूक दुपारी १२ वाजता, श्री शेषसाई महाआरती त्यानंतर गोपालकाला धूप आरती भोजन वितरण भजन संध्या व इतर समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास गावातील तसेच बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्री शेषसाई दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री शेषसाई मंदिर देवस्थान व ग्रामवासिय जनता कोंढाळा यांनी केले आहे.
News - Gadchiroli