काँग्रेस लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचा दर्जा मागणार नाही


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ५२ खासदार निवडून आले.  विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी २ खासदार कमी पडत आहेत. त्यामुळे  लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचा दर्जा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांची संख्या कमी असल्याने आपण हा दर्जा मागणार नसल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे. 
दरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नेता निवडीची प्रक्रिया पार पडली.यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते.  नेता निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात काँग्रेसचे 52 खासदार असून ते आक्रमकपणे भूमिका संसदेत मांडतील असे म्हटले. 
लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा गटनेता कोण असेल याची निवड सोनिया गांधी करणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांना गटनेते बनविण्यात आले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे, यामुळे काँग्रेसचे नवा गटनेता कोण होतो याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-01


Related Photos