कैलास कोरेत यांच्या मुलीच्या वाढदिवसाला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्रा यांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव, कट्टर कार्यकर्ते कैलास कोरेत यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्य माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहत पूर्वी उर्फ बुलबुल ला आशीर्वाद दिले.
कैलास कोरेत यांच्या मुलीचा २२ फेब्रुवारी रोजी प्रथम वाढदिवस कार्यक्रम त्यांच्या आलापल्ली येथील निवास्थानी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमंत्रणाला मान देत भाग्यश्री आत्राम यांनी हजेरी लावले. कोरेत कुटुंबीयांची भेट घेत आस्थेने संवाद साधत पूर्वी ला भरभरून शुभेच्छा दिले.
यावेळी आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम, माजी जि.प. सदस्य लैजा चालूरकर, ग्रा.प. सदस्य पुष्पा अलोने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, नागेश करमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli