जगन मोहन रेड्डी यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ


वृत्तसंस्था / विजयवाडा : वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी विजयवाडा येथे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल ई एस एल नरसिम्हन यांनी त्यांना विजयवाडा येथील आयजीएमसी स्टेडियमवर आयोजीत भव्य सोहळ्यात मुख्यमंत्रीपदची शपथ दिली. या सोहळ्याला डीएमकेचे अध्यक्ष एम के स्टॅलीन, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५  पैकी तब्बल १५१ जागांवर  यश मिळवले आहे.  शिवाय लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागा जिंकल्या आहेत. शपथविधी सामारंभाअगोदर जगन मोहन रेड्डी यांनी स्थानीक संत महंतांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतले. आंध्र प्रदेशमध्ये वाएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा सुपडा साफ केला आहे. रेड्डी यांनी शपथविधी समारंभासाठी  टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनादेखील निमंत्रण दिले होते. मात्र चंद्राबाबू नायडू यांनी समारंभापासून दुरच राहणे पसंत केले.   Print


News - World | Posted : 2019-05-30


Related Photos