भाजपा पदाधिकारी यांनी गाव चलो अभियानात सहभागी होऊन सशक्त, स्वावलंबी व विकसित भारत बनविण्याचा संकल्प घेवुन अभियान पूर्ण करावे : इंजि प्रमोद पिपरे
- भाजपा जिल्हा गडचिरोलीची गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशाची अंतर्गत आणि बाहय सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकी करिता केंद्र व राज्य सरकारची येशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी यांनी गाव चलो अभियानात सहभागी होऊन सशक्त, स्वावलंबी व विकसित भारत बनविण्याचा संकल्प घेऊन प्रत्येक गावा-गावात जाऊन गाव चलो अभियान पुर्ण करावे.असे आवाहन लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली ची गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन धानोरा रोड वरील महाराजा सेलिब्रेशन सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रमोद पिपरे बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदास आंबडकर, खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश सदस्य रविंद्र ओल्लारवार, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीता पिपरे, महामंत्री प्रकाश गेडाम, किसान आघाडी प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन एनगंधलवार, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, आनंद भांडेकर, गोवर्धन चव्हाण, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे तसेच जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महामंत्री, सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, सुपर वारीयर्स, बुथ पालक व बुथ प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी केले.
News - Gadchiroli