तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी


- धामणगाव तालुक्यातील  सातेफळ फाट्याजवळ ची घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धामणगाव :
  अवैध रेती नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करीत असताना चांदूर रेल्वेचे प्रभारी एसडीओ तथा धामणगावचे  तहसीलदार   अभिजित नाईक  यांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडवले. यात तहसीलदार, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत . सदर  घटना आज १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता सातेफळ फाट्याजवळ घडली. 
या घटनेत तहसीलदार अभिजित नाईक (४०),   चालक महेंद्र नागोसे आणि कर्मचारी बठे गंभीर जखमी झाले आहेत. 
धामणगावचे तहसीलदार अभिजीत नाईक हे शासकीय वाहन क्रमांक एम एच २७ एए ५०३ ने चांदूर रेल्वेकडे एसडीओंचा प्रभार सांभाळण्याकरिता जात होते. सातेफळ फाट्याजवळ रेतीने अर्धवट भरलेला ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स २९० च्या चालकाला संबंधित ट्रक थांबण्यासाठी हात दाखविला असता ट्रकचालकाने थेट तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक चढविला.  तिन्ही जखमींना चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेती चालकाने मुद्दामपणे शासकीय वाहनाला उडवून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार तहसीलदार अभिजित नाईक यांच्यावतीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.  तळेगाव दशासर व चादूर रेल्वेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .   Print


News - Rajy | Posted : 2018-11-19


Related Photos