देशात मोदी लाट कायम, काॅंग्रेसला काही राज्यात भोपळाच!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
देशातील ५४२ लोकसभा क्षेत्रांच्या निवडणूकीचा निकाल आज २३ मे रोजी जाहिर होत आहे. या निकालात २०१४ पेक्षाही अधिक जोरदार मोदी लाट दिसून येत असून देशात भाजपाचा बोलबाला आहे.
भारतीय जनता पक्ष देशातील ३४० हून अधिक जागांवर पुढे आहे. तर काॅंग्रेसला काही राज्यांमध्ये भोपळा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काॅंग्रेसची एकही जागा आघाडीवर नाही. सुरूवातीला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडीवर होते. मात्र ते सुध्दा आता मागे पडले आहेत. देशातील स्थिती पाहता भाजपा ३४० जागांवर आघाडीवर आहे. काॅंग्रेस केवळ ९४ तर अन्य १०९ उमेदवार आघाडीवर आहेत. राज्यात भाजपा २४ , शिवसेना २० , राकाॅ ३ जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य एक उमेदवार आघाडीवर आहे. काॅंग्रेसला अद्याप भोपळाही फोडता आलेला नाही. यामुळे काॅंग्रेसचा सुपडा साफ होण्याची चिन्हे आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-23


Related Photos