इंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अंकीसा (सिरोंचा) :
सिरोंचा तालुक्यातील जंगलातील मौल्यवान सागवानी लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. वनविभागाचे दक्ष अधिकारी तस्करीवर आळा घालण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेत आहेत. मात्र तरीही मोठमोठी लाकडे नदीपात्रातून वाहून घेवून जाण्यात तस्कर यशस्वी होत आहेत. अशीच तस्करी करीत असताना वनविभागाने कारवाई केली असून इंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. सध्या लाकडे बाहेर काढण्याची कारवाई सुरू आहे.
आज ६ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५  वाजताच्या सुमारास उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. यावेळी उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्रसहाय्यक श्रीकांत नवघरे, वनरक्षक ईरकीवार, चिचघरे, हलामी, मडावी, वाहनचालक किशोर जाधव आणि रोजंदारी मजुरांनी नदीपात्रातून लाकडे काढण्याची कारवाई केली. संपूर्ण लठ्ठे बाहेर काढून मोजमाप केल्यानंतर किती किमतीची लाकडे होती ही माहिती कळू शकणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-06


Related Photos