मतमोजणी केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९  चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार ,१२ गडचिरोली-चिमूर (अ.ज. ) लोकसभा मतदार संघ , सार्वत्रिक निवडणूक - २०१९ ची मतमोजणी कृषी महाविद्यालय, सोनापूर (गडचिरोली ) येथे दिनांक २३ मे २०१९ रोजी सकाळी ८ वाजता  पासून सुरु होणार आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची मतमोजणी भयमुक्त व शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कृषी महाविद्यालय, सोनापूर ( गडचिरोली ) येथिल मतमोजणी केंद्राचे १०० मिटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेश करतेवळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती ( निवडणूक संबंधित अधिकारी व कर्मचारी
वगळून ) एकत्रिरित्या प्रवेश करणार नाहीत , मतमोजणी केंद्राच्या १०० मिटरच्या परिसरात सार्वजनिक सभा घेता येणार नाही, मतमोजणी केंद्राचे परीसरात मतदानाचे कालावधीत ध्वनी प्रक्षेपण ( loudspeaker) करणार नाही. मतमोजणी केंद्राचे परीसरात कोणत्याही प्रकाराच्या घोषणा देता येणार नाहीत. मतमोजणी केंद्राचे परिसरात अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. मतमोजणी केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस /वाहनास प्रवेशास मनाई राहील. मतमोजणी केंद्राचे १०० मिटरच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षास किंवा त्यांचे कार्यकर्त्यास प्रचार व प्रसार करता येणार नाही. हे आदेश मतमोजणी केंद्रावर काम करणारे अधिकारी/ कर्मचारी, मतमोजणी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत त्यांचे कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. हे आदेश दिनांक २४ मे २०१९ चे रात्री १२. ०० वाजेपर्यंत संबंधित मतमोजणी केंद्राचे ठिकाणी अंमलात राहील. असे जिल्हादंडाधिकारी , गडचिरोली यांनी कळविले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-21


Related Photos