पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली पुरग्रस्त कोठी गावाला भेट


- नागरीकांशी साधला संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने कहर केला. यामुळे अनेक गावांना पुरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कालपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने अतिदुर्गम कोठी गाव पाण्याच्या वेढ्यापासून मुक्त झाला. यामुळे पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग हे कोठी गावात पोहचले.
कोठी येथील नागरीकांनी पोलिस अधीक्षकांना गावात पुरामुळे झालेले नुकसान तसेच निर्माण झालेल्या समस्यांची माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी नागरीकांना आर्थिक मदत केली. नागरीकांना धिर देत जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. पुरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-09


Related Photos