वाघाच्या हल्ल्यात महिला ठार : खेडी येथील घटना


- सावली तालुक्यातील या आठवड्यातील तिसरी घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली : तालुक्यातील 7 किमी अंतरावर असणाऱ्या रुद्रापूर येथे काल एका शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर आज ही सावली पासून 3 किमी अंतरावरील खेडी येथे शेतात कापूस काढत असताना वाघाने हल्ला करून स्वरूपा प्रशांत येलेटीवार (50) ला ठार केले आहे.
सदर घटनेची माहिती वनविभाग सावलीला देण्यात आली आहे.
वन्यजीवांच्या अधिवासावर मानवी आक्रमण वाढू लागल्याने वन्य प्राण्यांचा मनुष्यवस्तीत वावर वाढू लागला आहे. यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे.
सावली तालुक्यात मनुष्यांवर प्राण्यांचे हल्ले होत असून प्रशासनाने त्वरित पावले उचलून येथील वाघ अन्यस्तरीय स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून व वन्यप्रेमी कडून मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. मागील आठवड्यात सामदा येथील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या प्रकरणाची शाही वाढते न वाढते तोच आठ दिवसात सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे दैनंदिन प्रमाणे आपल्या शेतीकडे जाण्यासाठी निघाले असता वाटते दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला करीत त्यांच्या मानेला पकडून वाघ हा जंगल परिसरात घेऊन गेला. तर आज कापूस वेचण्यासाठी गेलेल्या खेडी येथील महिलेवर हल्ला करून ठार केले.
या घटनेने मात्र खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे.
सावली तालुक्यातील या आठवड्यात ही तिसरी घटना घडली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2022-12-15