महत्वाच्या बातम्या

 मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार रामदास तडस यांनी घेतली भेट


- वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामासंदर्भात सकारात्मक चर्चा.

- विविध विषयावर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने दिले निवेदन.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामे, पंतप्रधान आवास योजना (शहरी) तसेच विविध विषयासंदर्भात मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खा. रामदास तडस यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी वर्धा विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. पंकज भोयर व धामणगांव विधानसभा क्षेत्राचे आ. प्रताप अडसड उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली व विकास कामाकरिता निधी उपलबध करुन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा च्या वतीने ओबीसी समाज आरक्षण तेली समाजाला संख्येच्या आधारावर आरक्षण देणे, बिहार राज्याप्रमाणे तेली समाजाला आरक्ष देणे, मुंबई येथे तेली समाजासाठी सामाजिक सभागृह, संताजी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, मध्यप्रदेश सरकार व राजस्थान सरकारच्या धर्तीवर तेलघाणी विकास मंडळाची स्थापना करावी या संदर्भात निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष खा. रामदास तडस यांनी दिले. यावेळी  प्रांतीकचे महासचिव डॉ. भुषण कर्डीले, प्रांतिकचे कोषाध्यक्ष गजानन (नाना) शेलार, सहसचिव जयेश बागडे, विपीन पिसे उपस्थित होते. यावरही सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.





  Print






News - Wardha




Related Photos