महत्वाच्या बातम्या

 आता राशन दुकानातही मतदार नोंदणीची सोय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मतदार नोंदणी सुलभ व्हावी या उद्देशाने राशन दुकानात नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे व  दुरुस्तीबाबत सर्व नमुने उपलब्ध करुन दुकानदारांनी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी माधुरी तिखे यांनी केले.

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मिशन युवा इन उपक्रमांतर्गत १७ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी तसेच मतदार यादीतील नोंदीपासून वंचीत पात्र नागरीकांना आणखी एक संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयात परीमंडळातील राशन दुकानदारांची सभा आयोजित करण्यात आली होती.

१७ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाचे व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) मोबाईल ॲप्लीकेशनद्वारे मतदार नोंदणी कशी करावी याची माहिती प्रत्येक राशन दुकानाचे माहिती फलकावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. नोंदणी करतांना काही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक १९५० वर संपर्क करावा किंवा मतदार नोंदणी व अधिक माहीतीसाठी मतदार नोंदणी अधिकारी, ५६-नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ, नागपूर येथे संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचेा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रोहीणी पाठराबे, नायब तहसिलदार सत्यजित भोतमांगे तसेच दुकानदार सुभाष मुसळे, प्रफुल भुरा, रवी दावडा, नवीन वासवाणी, माया कांबळे, सतीश पाडे यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos