महत्वाच्या बातम्या

 निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम


- स्व. राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आलापल्ली : क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी नैपुण्य प्राप्त केले ते यशस्वी झाल्याची दिसून येत आहे. खेळाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता आपल्याला गतिमान चातुर्य टिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करायचे असेल तर कठोर परिश्रमाची गरज आहे. जे अडचणीवर मात करून पुढची पायरी शोधतात तेच यशस्वी होतात. त्यामुळे निश्चित ध्येय गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथील क्रीडा संकुल मैदानात स्व. राकेश कन्नाके स्मुर्ती प्रीत्यर्थ एकता व्हॉलीबॉल क्लब, आलापल्ली तर्फे आयोजित भव्य रात्र कालीन व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह उद्घाटक म्हणून माजी प.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर मेश्राम, उपसरंच विनोद अक्कनपल्लीवार, माजी जि.प. सदस्य लैजा चालुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, ग्रा.प. सदस्य पुष्पा अलोने, मनोज बोलूवार, सोमेश्वर रामटेके, स्वप्नील श्रीरामवार, छाया सप्पीडवार, प्रतिष्ठित नागरिक तथा राकॉचे वासुदेव पेद्दीवार, नागेपल्लीचे ग्रा.प. मलरेड्डी येमनूरवार, सदस्य कैलास कोरेत, सांबय्या करपेत, बालाजी गावडे, पराग पांढरे, सुचिता खोब्रागडे, इरफान शेख, संजय मडावी, इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आपल्या भागात विविध खेळ खेळले जातात. काही खेळाडू विविध खेळात सातत्य ठेवतात तर काही खेळाडू केवळ स्पर्धा असले की, खेळतात. कुठल्याही खेळात नियमित सराव आवश्यक असते. उत्कृष्ट खेळाडूंना आता चांगली संधी उपलब्ध झाली आहे. व्हॉलीबॉल, कबड्डी आणि क्रिकेट सारख्या खेळांना विशेष महत्त्व आहे. प्रो कबड्डी आणि आयपीएल मुळे खेड्यापाड्यातील खेळाडू समोर येत आहेत. त्यामुळे कुठलही खेळ असो नियमित सराव करा आणि मिळालेल्या संधीचा सोने करा, असे आवाहन भाग्यश्री आत्राम यांनी केले.

या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉल चमुंनी सहभाग घेतला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व्हॉलीबॉल खेळत मैदान गजविले. दरम्यान पाहुण्यांचा क्रीडा संकुल येथे आगमन होताच एकता व्हॉलीबॉल क्लब तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आयोजकांनी चांगले नियोजन केले होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos