महत्वाच्या बातम्या

 विविध व्यवसायिक निःशुल्क प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन नागपुरद्वारे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची ७ ऑगस्ट असून प्रशिक्षणात १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना मुलाखतीद्वारे प्रवेश देण्यात येईल.

जिल्ह्यात फूड प्रोसेसिंग, मसाले उत्पादन प्रशिक्षण, हस्तकला, ब्युटीपार्लर, गृह उद्योग आदी व रामटेक आणि भिवापूर येथे हस्तकला व टेलरिंग प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात तांत्रिक व व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा उद्देश जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयं रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासकीय योजनांची माहिती देणे हा आहे.

अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बँक पासबूक झेरॉक्स, २ पासपोर्ट साइज छायाचित्रे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व अधिक माहिती करीता प्रकल्प अधिकारी (एम.सी.ई.डी), पहिला माळा, उद्योग भवन, जिल्हा न्यायालच्या मागे, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos