महत्वाच्या बातम्या

 माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नृत्यकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण


- आविस कट्टर समर्थक ग्रुप अल्लापल्ली/अहेरी तर्फे आयोजित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : आविस कट्टर समर्थक ग्रुप आलापल्ली/अहेरी तर्फे राज्य स्तरीय डान्स काॅम्पीटेशान कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमातील सोलो डान्स प्रथम पारितोषिक व सोलो डान्स द्वितीय पारीतोषिक, असे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून २० हजार रु. देण्यात आले.

यावेळी रोज करपेत नगराध्यक्ष नगरपंचायत अहेरी, शैलेंद्र पटवर्धन उपाध्यक्ष नगरपंचायत अहेरी, अहेरी माजी प.स. उपसभापती सोनाली कंकडालवार, विलास सिडाम नगरसेवक अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, सुगंधा मडावी माजी ग्रा.प. सरपंच तथा विद्यमान सदस्य आलापल्ली, उषा आत्राम ग्रा.प. सदस्य आलापल्ली, रजनी गंजीवर ग्रा.प. सदस्य आलापल्ली, सलीम शेख, पो.उप. निरीक्षक चव्हाण, विनोद रामटेके, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे सह आविसचे शकडो कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos