आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले डोहे कुटुंबीयांचे सांत्वन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा शहरात काही दिवसापूर्वी अंधाधुंद गोळीबार झाला. यात पूर्वशा सचिन डोहे यांना गोळ्या लागल्या. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज राजुरा येथील डोहे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मृतक पूर्वशा सचिन डोहे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी सचिन डोहे, ज्योती डोहे, सुदर्शन डोहे, सुलोचना पावडे, जुंगल डोहे, जीवतोडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, काँग्रेस महिला नेत्या कुंदा जेणेकर, माधुरी भोंगळे, दीपक झाडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, हि घटना अतिशय गंभीर असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur