दारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
  रामपूर येथे ट्रक मध्ये अवैधरित्या दारू आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच शुक्रवारच्या रात्री २ वाजता ट्रकची झडती घेतली असता त्यात रॉकेट कंपनीच्या २००० निपा, १२ चाकी ट्रक, मोबाईल असा १४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 
राजूर - वणी, जि. यवतमाळ येथून रामपूर येथे ट्रक ने दारू वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून रात्री २ वाजता पोलिसांनी हि कार्यवाही केली. दारू किंमत २ लाख, १२ चाकी ट्रक क्रमांक एम.एच. ए.बी. ९१९९ किंमत १२ लाख, मोबाईल ५०० रु. व २००० हजार रुपये नगदी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ट्रकचालक व मालक अनिलकुमार अंकलू रेड्डी (५५)  रा. रामपूर, नरसीमालू रा. राजूर-वणी, जि. यवतमाळ, शारदा अनिलकुमार रेड्डी रा. रामपूर यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. 
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, उपपोलीस निरीक्षक चुंचूवार, हवालदार रविंद्र नक्कनवार, गावतुरे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप बडगुजर, अमोल मत्ते व चालक लक्ष्मण यांनी केली.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-24


Related Photos