राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपच्या वाटेवर ?


-  नगरमध्ये होणाऱ्या जाहीरसभेत भाजपामध्ये प्रवेश करण्याची श्यक्यता 
वृत्तसंस्था / मुंबई : 
 राधाकृष्ण विखे पाटीलही लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. नगरमध्ये होणाऱ्या जाहीरसभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काही आमदारही भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर लोकसभेच्या जागेचा तिढा न सुटल्यामुळे त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आहे. 
  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात निश्चित भाजपाला बळ मिळेल तर काँग्रेसला याचा फटका बसेल.   अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सुजय विखे पाटील भाजपामध्ये गेल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटीलही लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली होती.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी २३ मे नंतर भाजपामध्ये प्रवेश करावा अशी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका आहे. पण २३ मे नंतर पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता असल्यामुळे ते आधीच प्रवेश करु शकतात. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार हे भाजपामध्ये प्रवेश करतील, असे वृत्त आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-08


Related Photos