जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : काटोल उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
तालुकास्तरीय प्रशिक्षणात योजनेची सर्वसाधारण माहिती, जल सुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी प्रक्रिया, आराखड्याची रचना, प्रमुख घटक व उपाययोजना विविध संलग्न विभागातील योजनांचे सादरीकरण तसेच ग्रामस्तरावर भूजल पातळी पर्जन्यमान मोजमाप उपकरणे, पिझोमीटर, भूजल माहिती संकलन केंद्र व विविध स्तरावरील सामाजिक उपक्रम तसेच उपाययोजना याबाबत तालुकास्तरीय संलग्न विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण शिबिरास उपविभागीय अधिकारी चरडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाच्या सहायक भूवैज्ञानिक ईशदया घोडेस्वार, कनिष्ठ भूवैज्ञानिक राजेश गावंडे, नंदकिशोर बोरकर, नंदकिशोर काळबांडे, तांत्रिक अधिकारी बाबा भसारकर, जल संवर्धन तज्ज्ञ दर्शन दुरबुडे, कृषीतज्ञ प्रतीक हेडाऊ, माहिती शिक्षण संवादतज्ज्ञ निलेश खंडारे, जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेच्या समन्वयक विषयतज्ञ ममता बालपांडे, समूह संघटक, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
News - Nagpur