पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी महाग


वृत्तसंस्था / मुंबई :   आज पुन्हा एकदा पेट्रोल 18 पैसे आणि डिझेल 31 पैसे महाग झाले असून मुंबईत  प्रति लिटर दरांमागे आता पेट्रोलसाठी 88 रुपये 12 पैसे मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी 78 रुपये 82 पैसे मोजावे लागणार आहेत. आठवडा भरापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींचे दर लिटरमागे अडीच रुपये कमी केल्याची घोषणा केली होती. यानंतर महाराष्ट्र सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची कपात केली होती.  
मात्र त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ सुरुच असल्याने पुन्हा एकदा पेट्रोल प्रति लिटर नव्वदीचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. याआधी 11 ऑक्टोबरला पेट्रोल 9 पैसे तर डिझेल 30 पैसे महागले होते. आज आता पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 88 रुपयांवर तर डिझेलचे दर 78 रुपयांच्या वर गेल्याचे दिसून येते आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-13


Related Photos