हायस्पीड इंटरनेटसाठी ऍमेझॉन ची ३ हजार हुन अधिक उपग्रह सोडण्याची तयारी


वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को :  ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ऍमेझॉन’ ही आता हायस्पीड इंटरनेटसाठी तीन हजार उपग्रह सोडण्याच्या तयारीला लागली आहे. प्रसिद्ध उद्योगपती जेफ बेजॉस यांनी ‘स्पेस वेंचर’ उपक्रमांतर्गत ‘प्रोजेक्ट वुईपर’ ही योजना तयार केली आहे. या माध्यमातून अंतराळात ३  हजार २३६ उपग्रहांचे जाळं उभारले जाणार आहे. त्याद्वारे अजूनही इंटरनेट न पोहोचलेल्या भागात वेगवान इंटरनेट सेवा पुरवण्यात येणार आहे. या कामासाठी नोकरीच्या जाहिराती अलीकडेच ऍमेझॉनने प्रसिद्ध केल्या आहेत.
या संपूर्ण प्रोजेक्टसाठी अब्जावधी डॉलरचा खर्च होणार आहे. ‘गीकवायर’ या संकेतस्थळावर या प्रोजेक्टची सर्वात आधी माहिती देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलरचा खर्च होणार असल्याचे समजते. ‘प्रोजेक्ट वुईपर’ हे एक नवे पाऊल आहे. या उपग्रहामुळे लाखो लोकांना अत्यंत वेगवान इंटरनेटची सुविधा मिळेल असा विश्वास ऍमेझॉनने व्यक्त केला आहे.  Print


News - World | Posted : 2019-04-08


Related Photos