जंगल परिसरात लपवून ठेवलेला दारूसाठा बल्लारपूर पोलिसांनी केला जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूर पोलिसांनी जंगल परिसरात लपवून ठेवला दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जंगलात दारू लपवून ठेवून बल्लारपूर शहरात दारू विक्री केली जात असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काल २० ऑगस्ट रोजी सकाळपासूनच जंगलात शोधमोहिम राबविली. चार - पाच तास शोधमोहिम राबविल्यानंतर एका ठिकाणी ६५ पेट्या देशी दारू व एक विना क्रमांकाची मोपेड दुचाकी आढळून आली. पोलिसांनी दारू तसेच दुचाकी जप्त केली. या कारवाईदरम्यान एक आरोपी झुडूपांचा फायदा घेत पसार झाला. 
अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर असतानाही जास्त रक्कम घेवून दारूतस्कर दारू तस्करी करीत आहेत. संपूर्ण शहर फिरल्यानंतर मद्यपींना एखाद्या ठिकाणी दारू मिळत आहे. मात्र त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. काही दिवसाआधी ठाणेदार दीपक गोतमारे यांनी चक्क दारू विक्रेत्याच्या घरासमोरच पोलिसांचा पहारा लावला होता. यामुळे दारू विक्रेते व पिणारेसुध्दा दिसत नव्हते. 
जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गोदळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आंचल कपूर, मनोज पिदुरकर, प्रशांत निमगडे, अनुप आष्टूनकर, सुनिल कांबळे, पोलिस उपनिरीक्षक डाकेवार, राकेश बंजारीवाले, दिलीप आदे यांच्या चमुने जंगल परिसरात कारवाई केली. या कारवाईमुळे आता मद्यपींना दारूची टंचाई भासू लागली आहे.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-21


Related Photos