महत्वाच्या बातम्या

 उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे महाराष्ट्र पोलीस दिन उत्साहात साजरा


- उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र हे आकार मानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात तब्बल ३६ जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांची कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत. महाराष्ट्र पोलीस आज २ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा ६१ वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती १६६१ साली झाल्याचे आढळते. त्यावेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर १६७२ साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला. १९३६ मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे १९४७ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे ठेवले गेले. राज्य पुनर्गठन अधिनियम १९५६ नंतर, मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन, गुजरात पोलिस, म्हैसूर पोलिस (नंतर नाव बदलून कर्नाटक पोलिस) आणि महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी झाली. अखेर २ जानेवारी १९६१ साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरीत्या स्थापना झाली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. याच दिनाचे औचित्य साधून उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे महाराष्ट्र पोलीस दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लहरीचे सरपंच राजेश्वरी बोगामी व प्रभारी अधिकारी महादेव भालेराव यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उप पोलीस स्टेशन लाहिरीचे प्रभारी अधिकारी महादेव भालेराव यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा दैदिप्यमान इतिहासाबाबत उपस्थित त्यांना माहिती दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची निर्मिती व कार्यपद्धती याबाबत माहिती देऊन महाराष्ट्र पोलीस दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आश्रम शाळा लहरी येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मधील कामकाज व शस्त्र प्रदर्शन याबाबत एस आर पी एफ ग्रुप १४ औरंगाबाद पोलीस उपनिरीक्षक नलावडे जिल्हा पोलीसचे महिला पोलीस हवालदार शालू नामेवार, पोशि/अभिषेक पिपरे, उमेश कुणघाटकर यांनी माहिती दिली. सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दला विषयी आत्मीयता निर्माण झाली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार, संतोष काजळे  तसेच जिल्हा पोलीस व एस आर पी एफ चे  अंमलदार आदींनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos