महत्वाच्या बातम्या

 जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत ३० मी. अंतरावरील मीना पोलीस स्टेशन देवलापार एन एच ४४ रोड येथे १ डिसेंबरला सकाळी ०४.३० वा. ते ०५.०० वा.च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक विभाग हे पोलीस स्टेशन देवलापार येथील पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने काबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवलापार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन महेंन्द्रा पुरीओ कंपनीने वाहन के. एम. एच. ४० / सौ. डी. - ९८४२ चा चालक आरोपी जितेंन्द्र उर्फ सोनू राजू देशमुख (२१) विस्कान, ता. आमला जि. बैतुल मध्यप्रदेश, त्रिलोकचट बालकिसन पाटीदार (४२) रा. खापाखतेडा, ता. आमला, जि. बैतुल मध्यप्रदेश, नदीम आलमगीर कुरेशी (२१), नमीर भावीर कुरेशी (२०) दोघेही रा. मोहल्लाटीला भामशाबाद वा. फतेहाबाद जि. आगरा उत्तरप्रदेश त्यांच्या वाहनात ०९ गायी, ०६ गोरे व ०४ बछडे गोवंश हे अतिशय आखूड दोराने एकावर एक रत्न जनावरांचे कोणतीही बसण्याची व चारापाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करताना मिळाले. आरोपीताच्या ताब्यातुन असे एकुण १९ जिवन गोवंश जप्त करून त्यांच्यावर पशुवैदयकीय उपचार करून व टॅग करून गोवंश गौ. अनुसंधान केंद्र, देवलापार येथे जमा करण्यात आले.

सदर प्रकरणी पोलीस नाईक संदीप नागोसे व नं १९७४ पोलीस स्टेशन देवलापार यांच्या रिपोर्टवरून  पोलीस स्टेशन देवलापार येथे वरील आरोपीताविरुध्द कलम ११ (१) (प.) (इ) (च) प्रा. छ. अध सहकलम ५ (अ) ९ न. प्रा. स. का. सहकलम ३४ भादवी, सहकलम १८४, १७९ मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीताना अटक करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केशव पुजरवाड, पोलीस स्टेशन देवलापार, मो.क्र. ८६६८८६५२०३ हे करीत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos