आजचे दिनविशेष
२१ जुलै महत्वाच्या घटना
३५६ : ३५६ इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
१८३१ : बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
१९४४ : २० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.
१९६० : सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
१९७६ : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.
१९८३ : अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
२००२ : जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
२१ जुलै जन्म
१८५३ : ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
१८९९ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)
१९१० : स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०)
१९११ : भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
१९२० : गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००२)
१९३० : भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्म.
१९३४ : क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.
१९४५ : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
१९४७ : सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म.
१९६० : पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८८)
२१ जुलै मृत्यू
१९७२ : भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९)
१९९४ : मराठी बखर वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.
१९९५ : संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन.
१९९७ : साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९३६)
१९९८ : अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.
२००१ : दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८)
२००२ : मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.
२००९ : किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१३)
२०१३ : भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)
News - todayspecialdays