महत्वाच्या बातम्या

 नागपूर : विना फिटनेस धावणाऱ्या १३ स्कूल बसेस जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शहर व ग्रामीण भागातील तब्बल ७६२ स्कूल बस व स्कू ल व्हॅन विना फिटनेस रस्त्यावर धावत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक पोलिसाच्या संयुक्त तपासणीत ३६ वाहनांवर कारवाई केली.

यात १३ स्कूल बसेस जप्त केल्या : 

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतुकीचा आढावा घेण्यात आला. शहर व ग्रामीण भागातील ३,७५७ स्कूल बस व व्हॅनपैकी ७६२ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नसल्याचे पुढे आले. याची गंभीर दखल घेत त्यांनी सोमवारपासून संयुक्त मोहिम राबविण्याचा सूचना केल्या. त्यानुसार, आज शहरात विविध ठिकाणी स्कूल बस, खासगी बस व आॅटोरिक्षाची तपासणी करण्यात आली. दिवसभरात १३ बसेस व २३ आॅटोरिक्षा दोषी आढळून आल्या. या सर्व वाहनांना अडकवून ठेवण्यात आले. ज्यांनी दंड भरला त्यांना नंतर सोडून देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठलिही तडजोड नाही : 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांनी सांगितले, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार आजपासून स्कूल बस व इतरही वाहनांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विशेषत: स्कूल बसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येईल, कशी कुठलिही तडजोड केली जाणार नाही. कारवाईच्या या मोहिमेत शिथीलताही येणार नाही. या कारवाईच्या दरम्यान विद्यार्थी अडचणीत येणार नाही, याची काळजी पालक व शाळांनी घ्यावी. त्यांनी फिटनेस प्रमाणपत्र असलेल्या वाहनातूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos