बल्लारपुर तालुक्यातील ग्राम कवडजई परिसरात अवैध वाळू सह ट्रैक्टर जप्त
- एकुन ८ लाख १० हजार रुपये चा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पोस्टे कोठारी अंतर्गत ग्राम कवडजई परिसरात २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान अवैध वाळू चोरी करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच कोठारी पोलिसांनी कारवाई केली असता त्यात आरोपी ट्रॅक्टर चालक रवींद्र पेंदाम (३२) व मालक बालाजी धोंगे (५२) दोन्ही रा. कवडजाई असे संगनमत करून बिना रॉयल्टीने व शासनाची कोणतीही परवानगी न घेता ट्रॅक्टर मध्ये १ ब्रास वाळू चोरी करून वाहतूक करतांना मिळून आले. त्याचे ताब्यात असलेले ट्रॅक्टर व ट्रॉली व त्यामध्ये मिळून आलेली वाळू असा एकूण ८ लाख १० हजार रु. चा माल मिळून आल्याने गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गद्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात राजू पोरेते, साईनाथ उपरे, सचिन पोहनकर यांचे पथकाने केली.
News - Chandrapur