वासामुंडी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक, आयईडी स्फोटके जप्त


- घातपाताचा कट उधळला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या वासामुंडी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलिसांनी दोन ते अडीच किलो वजनाचा एक आयईडी, १ किलो वजनाची गन पावडर , दोन डिटोनेटर, पिट्टू तसेच मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले. सदर घटना आज २१ मार्च रोजी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास  घडली.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. हरी बालाजी, एटापल्लीचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात वासामुंडी जंगल परिसरात जलद प्रतिसाद दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान घातपाताच्या उद्देशाने नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षल्यांनी काढता पाय घेतला. यानंतर घटनास्थळावरून साहित्य जप्त करण्यात आले. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-21


Related Photos