महत्वाच्या बातम्या

 १ मार्चला पोलीस पाटील पदाकरिता आरक्षण सोडत सभेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा तालुक्यातील ३१ व पवनी तालुक्यातील २८ एकुण ५९ रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरिता मंजूर बिंदुनामावलीप्रमाणे प्रचलीत शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधीत गावाच्या लोकसंख्यानुसार करायची आहे. १ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बचत भवन, तहसिल कार्यालय भंडारा येथे आरक्षण सोडत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भंडारा तालुक्यातील गराडा बु, टवेपार, गणेशपुर, नवेगाव, वाकेश्वर, मोहदुरा, गोलेवाडी, खराडी, कोंढी, राजेदहेगांव, पाघोरा, टाकळी, खमारी, नांदोरा, रावणवाडी, खुर्शीपार, आमगांव, टेकेपार/नदी, सोनुली, पेवठा, चिचोली, टेकेपार, ठाणा/पे. पंप, मानेगाव, सर्पेवाडा, टेकेपार/डोडा, कवडसी, वडद, पुरकाबोडी, मौदी व कोथुर्णा या गावातील तर पवनी तालुक्यातील खैरी दिवाण, वलनी, खातखेडा, नायगाव, पन्नासी, अड्याळ, भुयार, सोनेगावं बुटी, बाम्हणी, वायगांव, आकोट, वडेगांव, शिवनाळा, कोटलपार, लावडी, लोणारा, मोखारा, इसापूर, सिंगोरी, रूयाळ, केसलापूरी, निमंगाव, निघवी, सिंदपूरी, कलेवाडा, आबांडी, तेलपेंढरी व फनोली या गावातील इच्छुक सभेला उपस्थित राहू शकतात, असे उपविभागिय अधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समिती-२०२३ रविंद्र राठोड यांनी कळविले आहे. 





  Print






News - Bhandara




Related Photos