महत्वाच्या बातम्या

 स्वंयम योजनेसाठी अर्ज करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सन-२०२३-२४ या सत्रामधील १२ वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनकरीता पंडीत दीनदयाल उपाध्यय स्वंयम  योजनेसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्यय स्वंयम (स्वाधार) धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी स्वताचे जात वैघता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, सदरचा विद्यार्थी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, परिक्षेचे गुणपत्रक, महा. बोनाफाईड सर्टिफिकेट, बँक खाते आधार संलग्न केल्याचा पुरावा, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इत्यादी), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, १२ वी मध्ये ६० % गुण मिळालेले विद्यार्थीच या योजनेस पात्र राहतील. इत्यादी कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात ३१ जुलै २०२३ पर्यंत सादर करावे, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos