महत्वाच्या बातम्या

 वाघाच्या हल्ल्यात गाय ठार : जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील इंदाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील रहिवासी मल्ला देबूडू अर्का यांच्या गायीवर गावानजीकच्या शेतशिवरात वाघाने गायीवर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली आहे. 

सदर घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली असुन संपूर्ण गावात भितीचे वातावरण पसरलेले आहे. या घटनेची महिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना देताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा करण्यासाठी वनविभागाला माहिती देण्यात आली. अश्या अनेक घटना परिसरात घडत असुन या  वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असे वनविभाग कर्मचाऱ्यांना यावेळी सांगण्यात आले. यावेळी वनपाल शहारे, वनरक्षक कुमारे, तेजू दुर्गे, प्रकाश पेंदाम, चिन्नु अर्का, जलपत अर्का, पांडु अर्का, गंगाराम तोर्रेम, अजय अर्का, साईनाथ अर्का, लक्ष्मण आत्राम उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos