महत्वाच्या बातम्या

 अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद : पोलीस स्टेशन रामटेकची कार्यवाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ रामटेक उपविभागात २३ जून २०२३ रोजी पेट्रोलिंग करीत असतांना मुख्यबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे रामटेक हद्दीतील १८ किमी अंतरावर चाचेर रोड रामटेक येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. 

अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ टिप्पर क्र. एम. एच. ४० ए. के. ६७३५ च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात टिप्पर चालक व आरोपी शाम अमिलाल दशमेर (४५) रा. वार्ड क्र. ०३ हिवरा बाजार ता. रामटेक हा टिप्परमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने त्याच्या ताब्यातून टिप्पर क्र. एम. एच.- ४० ए. के. - ६७३५ किमती अंदाजे १२ लाख रू. यामध्ये अवैध्यरित्या विनापरवाना ४ ब्रास रेती किंमती अंदाजे १२ हजार रू. ची एकुण किंमती अंदाजे १२ लाख १२ हजार रूपयाचा मुद्देमाल वाहतुक करतांना मिळुन आला.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी सरतर्फे पोशि शरद रविंद्र गिते (३४) रा. पोस्टे रामटेक यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास परी. पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के मो. नं. ९४०५९०३५२८ हे करीत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos