महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात आज दोन नव्या बाधितांची नोंद तर तीन जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 266 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 02 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38307 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37521 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 07 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 779 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.03 टक्के झाला आहे. आज कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, तर कोरोनामुक्तामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 01 व धानोरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos