महत्वाच्या बातम्या

 चोप येथील पोलीस पाटलाचे पद भरा : राधेश्याम बरय्या यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील चोप येथील पोलीस पाटलाचे पद सन २०१६ पासून रिक्त आहे. सन २०१७ मध्ये पोलीस पाटील पदासाठी ओबीसीचे आरक्षण निघाले होते. यासाठी अनेकांनी उपविभागीय कार्यालयात अर्ज सुद्धा सादर केले. मात्र, ही प्रक्रिया स्थगित झाली. यानंतर सन २०१८ मध्ये व्हीजेएनटीचे आरक्षण निघाले. मात्र, चोप येथे या प्रवर्गातील एकही कुटुंब नाही. त्यामुळे येथील पोलीस पाटलाचे पद रिक्तच राहिले. गावात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे, गावात अवैध व्यवसाय वाढू नये याबाबतही खबरदारी घेणे. गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्हांची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे आदी जबाबदारी पोलीस पाटलांवर असते. त्यामुळे चोप येथील पोलीस पाटलाचे पद तातडीने भरावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक राधेश्याम बरय्या यांनी केली आहे.

  Print


News - Gadchiroli
Related Photos