पोलिस दल, लोकसहभागातून जांबिया नाल्याची दुरूस्ती, २५ ते ३० गावांना होणार फायदा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने तांडव माजविले. यामुळे हेडरी उपविभागातील गट्टा जां. पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील गट्टा ते एटापल्ली मार्गावरील जांबिया नाला पुरामुळे वाहून गेला. मागील १५ दिवसांपासून गट्टा, गर्देवाडा, हिदूर, हिकेर, तोरगट्टा, झाारेवाडा, मोहंदी, हुंडसूर येथील नागरीकांचे एटापल्ली येथे येणे - जाणे कठीण झाले होते. ही बाब लक्षात घेवून जिल्हा पोलिस दल आणि लोकसभाभागातून जांबिया नाल्याची दुरूस्ती करण्यात आली. यामुळे आता २५ ते ३० गावातील नागरीकांना सोयीचे झाले आहे.
नाल्याच्या दुरावस्थेमुळे नागरीकांना जीवनावश्यक वस्तू तसेच आरोग्याच्या सोयीसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाबत लक्षात घेत गट्टा जां. पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुधीर पडोळे यांनी परिसरातील नागरीकांची बैठक बोलाविली. यानंतर पोलिस मदत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरीकांनी श्रमदान करून नाल्याची दुरूस्ती केली. यामुळे मार्ग सुकर झाला असून नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांचे अभिनंदन केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-19


Related Photos