महत्वाच्या बातम्या

 मशरूम उद्योगातून साधली आर्थिक उन्नती उत्पादन व प्रक्रिया उद्योग प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सेलसूरा-करंजी येथील मशरुम उद्योग स्टॉल धारक स्नेहलता मनोज सावरकर यांनी आतापर्यंत विक्रमी विक्री झाली असल्याचे सांगितले. 2022-23 वर्षात उत्पादन खर्च 1 लाख रुपये आला असून त्यातून इतर खर्च वजा जाता 7 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मनात काही करण्याचे ठरविले तर यश निश्चितच मिळते हे स्नेहलता सावरकर यांनी कृतीतून सिध्द केले आहे. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन इतरही नागरिकांनी स्वयंउद्योगाकडे वळावे व आपली आर्थिक उन्नती साधावा, असे त्या म्हणाल्या.


शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत कृषी सहसंचालक कार्यालयाच्या परिसरात 22 मे पासून विविध उत्पादन व प्रक्रिया उद्योगाचे विक्री प्रदर्शनात स्टॉल लावण्यात आले असून गेल्या एक महिन्यापासून शेतकरी उत्पादन व प्रक्रीया उद्योगांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या शंभरटक्के लाभ झालेला आहे.


श्रीमती सावरकर सेलसूरा विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेवून मशरुम उद्योगास सुरुवात केली. त्यासोबत त्यांना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या उद्योगास त्यांचे पतीन मनोज सावरकर हे नेहमी सहकार्य करीत आहेत.


मशरुमवर आधारित ड्राय मशरुम, मशरुम पावडर, मशरुम लोणचे, मशरुम मुरब्बा, मशरुम चटपटा, मशरुम नॉनखटाई, मशरुम चटणी, मशरुम फेसपॅक अशी विविध उत्पादने तयार करुन आज विक्रीस आहेत.
या विक्री प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस असून यामध्ये विविध उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. ग्राहकांचा सुध्दा मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos