महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिकांना रोजगाराची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकरिता मेस्कोमार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा प्रवर्गातून अशासकीय लिपिक टंकलेखककरिता एक रिक्त पद भरण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणी असलेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा उमेदवार हवे आहेत. या पदासाठी इच्छुक माजी सैनिक माजी, माजी सैनिक विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये 28 जून  रोजी सकाळी 11 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ कागदपत्रांसह व छायांकित कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos