तणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच : निवडणूक आयोग


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील असे निवडणूक आयोगाकडून आज १ मार्च रोजी स्पष्ट करण्यात आले.  सर्व राजकीय पक्षांबरोबर चर्चा केली आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 
लखनऊमध्ये दोन दिवस निवडणूक आयोगाची बैठक झाली. सध्या भारत-पाकिस्तामध्ये तणाव आहे. युद्धाची स्थिती असल्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत होती. पण निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूका ठरलेल्या वेळीच होतील हे स्पष्ट केले. एप्रिल आणि मे महिन्या दरम्यान वेगवेगळया टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात.  Print


News - World | Posted : 2019-03-01


Related Photos