महत्वाच्या बातम्या

 तीन तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी या तीन तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

विशेष ग्रामसभेची सुचना देणे (आरक्षण सोडत काढण्याकरिता) १६ जून विशेष ग्रामसभा बोलवुन तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील, आरक्षणची सोडत काढणे (अनु.जाती महिला, अनु. जमाती महिला, नामाप्र, सर्वसाधारण महिला) २१ जून सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करणे २२ जून प्रभागनिहाय आरक्षण निश्चीतीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी २३ जून ते ३० जून २०२३ उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेउून अंतिम अधिसुचनेस नमुना जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे १२ जुलै २०२३ जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतीम प्रभाग रचनेला नमुना अ व्यापक प्रसिध्दी देणे १४ जुलै २०२३ तरी संबंधित तहसीलदारांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबवून वेळोवेळी त्याचा अहवाल देण्याचे उपजिल्हाधिकारी मोरे यांनी कळवले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos