महत्वाच्या बातम्या

 हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशाला २३ जून पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : ओडिशा राज्यातील बरगढ येथे स्थित भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदवीका अभ्यासक्रमाकरिता राज्यातून १३ जागा तर आर्थिक दुर्बल घटकासाठी १ जागा तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पस करिता २ जागांच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता २३ जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगीक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यानी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्रं. २, ८ वा माळा, बि विंग, सिव्हील लाईन, नागपूर यांचेकडून प्राप्त करुन घ्यावा. कार्यालयाच्या  ०७१२-२५३७९२७ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. असे वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी कळवले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos