राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जनतेला आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अनेकदा नायल्याच्या चकरा मारूनही न्याय मिडण्यास विलंब होतो. असा अनुभव काहींना आलाच असेल. कंटाळून शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असेही वाटले असेल. परंतु न्याय प्रक्रियेत जलद न्याय मिळविण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे मात्र अनेकांना माहित नसेल. या पर्याय म्हणजे लोक अदालत होय. याच राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून देशात अनेक वाद निकाली निघाले आहेत.
राष्ट्रीय लोक अदालत हि एक पर्यायी विवाद निवारण यंत्रणा आहे. या ठिकाणी सामंजस्याने वादाची प्रकरणे सोडविली जातात. जी दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरतात.
लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय तात्काळ मिळतो. पैसा आणि वेळेची बचत होते. लोक अदालतीचा निवडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. निकाली निघण्याऱ्या प्रकरणामध्ये कोर्ट ची फी रक्कम परत मिडते. परस्पर संमतीने निकाल होत असल्यामुळे एकमेकांतील द्वेष वाढत नाही आणि कटुताही निर्माण होत नाही. लोक अदालत संपूर्ण भारतभरातील न्यायालयांमध्ये भरवली जाते.
९ डिसेंबर २०२३ रोजी राष्टीय लोक अदालत जिल्ह्या व सत्र न्यायालय गडचिरोली आणि अहेरी तसेच तालुका न्यायालय आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्टीय लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षकाऱ्यांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. सर्व तालुका पंचायत समितीने गट विकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतीने ग्रामसेवक यांना घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांची सर्व प्रकरणे लोक अदालतींमध्ये ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
तरी सर्वांनी ९ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये नगरपरिषद/ नागरपंचायत व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे जास्तीत जास्त प्रकरणे ठेऊन राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोक अदालतीचा लाभ घ्यावा आणि लोक अदालत यशस्वी करावी असे आवाहन आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी समस्त जनतेला आवाहन केले आहे.
News - Gadchiroli