नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /मुंबई : 
नालासोपारा स्फोटक प्रकरणी महाराष्ट्र एंटी टेररिज्म स्क्वॉडने (एटीएस) शुक्रवारी रात्री घाटकोपरमधून आणखी एकाला अटक केली आहे. अविनाश पवार (३०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला शनिवारी कोर्टात हजर केले असता त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात एटीएसने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि अजून तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. मुंबईसह कोल्हापूर, सोलापूर येथे घातपात करण्‍याचा आरोपींनी कट रचला होता, असा दावा एटीएसने केला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-08-25


Related Photos