महत्वाच्या बातम्या

 शाळा व्यवस्थापनाने स्कूल बसेसच्या योग्यता प्रमाणपत्राची वैधता तपासूनच विद्यार्थ्यांची ने-आण करावी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जून महिन्यामध्ये नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी शाळेकरी विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसच्या योग्यता प्रमाणपत्राची वैधता तपासून व योग्यता प्रमाणपत्र वैध असलेल्या वाहनांची फेर तपासणी करुन वाहनांचे सर्व कागदपत्रे वैध असल्याबाबत शहानिशा करूनच शाळकरी मुलांची ने-आण करावी.

परिवहनेत्तर (खाजगी वाहनातून) जसे ऑटोरिक्षामधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येऊ नये. ज्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता संपलेली असल्यास त्याची पूर्तता करुनच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos