महत्वाच्या बातम्या

 महामंडळे कर्ज देण्यास तयार, योग्य प्रस्ताव सादर करा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- महामंडळाच्या योजनांसाठी प्रसिध्दी मोहीम 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / नागपूर : समाजातील विविध घटकांसाठी अनेक महामंडळाच्या विविध योजना आहेत. परंतु लाभार्थी महामंडळापर्यंत पोहचतच नाही. यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही, या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महामंडळाशी संपर्क साधून अर्ज करावेत व योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.


वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास  महामंडळ - हे विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघुउद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग  सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त विद्माने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गटकर्ज व्याज परतावा योजना योजना सुरु आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो तर गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआय समोर साऊथ अंबाझरी रोड, नागपूर येथे संपर्क साधावा अथवा दुरध्वनी क्र. 0712-2246894 वर संपर्क साधावा. किंवा www.vjnt.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.


संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ- चर्मकार समाजातील चांभार , मोची, ढोर व होलार यातील 18  ते 50 या वयोगटातील  पात्र उमेदवारांकरीता व्यवसाय करण्यासाठी विशेष घटक योजना व बिज भांडवल योजना सुरु करण्यात आल्या आहेत. योजनेच्या लाभासाठी उमेदवारांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ, 305, तिसरा माळा, बी विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआय समोर साऊथ अंबाझरी रोड, नागपूर येथे संपर्क साधावा.


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ – विविध प्रवर्गासाठी  महामंडळ आहेत, परंतु ज्यांच्यासाठी कोणतेही महामंडळ नाही  अशा बेराजगार उमेदवारासाठी एक हक्काचे महामंडळ.


या महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या मराठा व ज्या प्रवर्गाकरीता इतर स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा बेरोजगार उमेदवारांनी या महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा.या महामंडळाद्वारे वैयक्तिक कर्ज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज या तीन  योजना प्रामुख्याने राबविल्या जातात. योजना लाभार्थीभिमूख असून जोपर्यंत आवश्यक माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही तोपर्यंत कार्यवाही करता येत नाही.

हे महामंडळ जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत क्र.2 दुसरा माळा(विग-ए), सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे कार्यरत आहे. बेराजगार उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधावा.


इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

शासनाने इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यांतर्गत, देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये व परदेशात शिक्षणासाठी 20 लक्ष रुपये मर्यादेत कर्जावर व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळार्माफत सुरु केली आहे. या योजनेत बँकेकडील भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत परतावा मिळणार आहे. योजनेच्या अटी व लागणारी कागदपत्रे याप्रमाणे आहे. उमेदावाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा, इमाव असल्याचा जातीचा दाखला, तहसीलदार यांचा कौटुंबीक वार्षिक उत्पन्न 8 लक्ष पर्यंतचा दाखला किंवा नॉन क्रिमीलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा, उमेदवार व त्याचे पालक यांचे आधार कार्ड, छायाचित्र, आधार लिंक बचत खाते पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्र आदी कागदपत्रे जोडावेत.  योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या www.msobcfdc.org  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत.


राज्य व देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासामध्ये येणारे  उपक्रम

आरोग्य विज्ञान  व अभियांत्रिकी शाखेच्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक  व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान, दुग्धविज्ञान शाखेमधील सर्व संबंधित अभ्यासक्रम आदी.


व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी

शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने उमेदवाराला वितरीत केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा महामंडळ उमेदवारांच्या आधार लिंक बँक खात्यात वर्ग करेल. परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त पाच वर्ष असणार आहे.

ज्या पात्र उमेदवारांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर जावून अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रहाटे कॉलनी,  नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0712-2956086, मो. क्र. 9423677744 यावर संपर्क साधावा.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ – यामहामंडळमार्फत दारिद्र रेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग व तत्सम सामजातील लोकांचे जीवनमान उंचाविणे व समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामजिक विकास होण्यासाठी मदत करण्यात येते.

योजनांच्या माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआय समोर साऊथ अंबाझरी रोड, नागपूर येथे संपर्क साधावा. 

  Print


News - Nagpur
Related Photos